संपामुळे १०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले

मुंबई: एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे.  विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे महामंडळाचे आणि पर्यायाने कामगारांचे नुकसान होत आहे. हे नुकसान कोणताही राजकीय पक्ष भरून देणार नाही, त्यामुळे कामगारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे. दरम्यान, संपामुळे २८ ऑक्टोबरपासून आतापर्यंत महामंडळाचे १०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे.

‘ना काम, ना दाम’ यानुसार आंदोलनात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना त्या-त्या दिवसाचे वेतन मिळणार नाही. मंगळवारी २५० पैकी २४७ आगार बंद झाले असतानाच बुधवारी सर्व आगारांतील एसटी सेवा बंद झाली.