एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी

निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये  काही बदल करण्यात आले.

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी केलेल्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे गुरुवारी सुनावणी होणार आहे.

या गैरव्यवहाराबाबत कोटेचा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती व त्यांनी ती चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठविली आहे. टाळेबंदी काळात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावेत, असे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते.

त्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट १५० कोटींवरून १०० कोटींवर आणण्यात आली. याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये  काही बदल करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: St ticket machine purchase fraud case hearing today akp