मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना चालना मिळावी म्हणून मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलत ३१ डिसेंबपर्यंतच राहणार असून, नवीन वर्षांत मुद्रांक शुल्क एक टक्याने वाढेल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले.

करोनाच्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवहारांना आलेली मरगळ दूर व्हावी आणि व्यवहार वाढावेत यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सध्या मुंबईत मुद्रांक शुल्कात तीन टक्के  सवलत असून तो दर पाच टक्क्यांऐवजी दोन टक्के  आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात मुद्रांक शुल्कात दोन टक्के  सवलत देत तो तीन टक्के आकारण्यात येत आहे. मुद्रांक शुल्कातील सवलतीच्या योजनेतील हे दर ३१ डिसेंबपर्यंत आहेत. तर १ जानेवारी २०२१ पासून सध्याच्या सवलतीच्या मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ होईल. ही सवलत घेण्यासाठी लोकांनी सदनिका-मालमत्ता खरेदी व्यवहार उरकण्यास सुरुवात के ल्याने मुंबईसह राज्यातील मुद्रांक कार्यालयांमध्ये गर्दी उसळली आहे. लोकांचा हा प्रतिसाद पाहून ३१ डिसेंबपर्यंतची सवलत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात येणार का याबाबत चर्चा सुरू होती. ही सवलत वाढवावी, अशी मागणी विकासकांकडूनही करण्यात येत आहे.

मुद्रांक शुल्कातील सवलतीच्या दरात ३१ डिसेंबरनंतर वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळेच २५ ते २७ डिसेंबर या काळात मुद्रांक शुल्क कार्यालये सुरू ठेवण्यात आली.

– बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

Story img Loader