मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास विलंब होत असल्याने तात्पुरत्या जागेची व्यवस्था करून जयंतीदिनी किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयाबाबत बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

After the suspension Vice-Chancellor Dr Subhash Chaudhary took charge of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर: निलंबनानंतर कुलगुरू डॉ. चौधरींनी पदभार स्वीकारला
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब
arvind kejriwal
मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करावा अशीही बैठकीत चर्चा झाली. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास  जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २८ सप्टेंबरला भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे, यानिमित्त यावर्षी पहिली तुकडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.