मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास विलंब होत असल्याने तात्पुरत्या जागेची व्यवस्था करून जयंतीदिनी किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयाबाबत बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start lata mangeshkar music college chief minister eknath shinde order ysh
First published on: 17-08-2022 at 00:02 IST