मुंबई : परराज्यात रक्त व रक्ताचे घटक हस्तांतरित करण्यावर ३१ जानेवारी २०२५ पर्यंत घातलेली तात्पुरती बंदी अखेर राज्य रक्त संक्रमण परिषदेने उठवली. मात्र बंदी उठवताना आणि परराज्यामध्ये रक्तसाठा हस्तांतरण करण्यापूर्वी आसपासच्या परिसरात आणि जिल्ह्यात पुरेसे रक्त उपलब्ध असल्याची खात्री करावी अशी सूचनाही राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना केली आहे.

दिवाळीची सुट्टी आणि त्यापाठोपाठ आलेली विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले. परिणामी नोव्हेंबरमध्ये राज्यातील रुग्णांना चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक होता. रक्तपेढ्यांकडून रक्त मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केल्या होत्या. असे असताना राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकत असल्याची बाब उघडकीस आली होती. राज्यातील रक्ताची गरज भागविण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त व रक्त घटकांची विक्री करण्यावर बंदी घातली होती. मात्र दिवाळीनंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे डिसेंबर अखेरीस राज्यातील रक्तपेढ्यांकडे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाला. अतिरिक्त रक्तसाठा वाया जाऊ नये यासाठी राज्यातील रक्तपेढ्यांनी आंतरराज्यीय रक्त हस्तांतरण करण्यास परवानगी देण्याची विनंती परिषदेकडे केली होती. रक्तपेढ्यांनी आपल्याकडे उपलब्ध अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांचा तपशील परिषदेला सादर केला होता. पुणे, सोलापूर, सातार, नाशिक या जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांनी  बंदी उठविण्यासाठी आग्रह धरला होता.

New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Dama experiment at Government Medical College in Yavatmal
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डामा’चा प्रयोग, नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
mhada lottery draw results today in presence of dcm Eknath Shinde
म्हाडाच्या २२६४ घरांसाठी आज सोडत; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम
Gas leak during excavation in Vasai Agarwal Nagari
वसई: खोदकाम करताना गॅस गळती, रहिवाशांमध्ये घबराट
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Vaibhavi Deshmukh Question to Namdevshastri
Vaibhavi Deshmukh : वैभवी देशमुखचा नामदेवशास्त्रींना सवाल, “माझ्या वडिलांवर झालेले वार, त्यांचं रक्त हे…”

हेही वाचा >>>पुणे वर्तुळाकार रस्ता: तीन टप्प्यासाठी आर्थिक निविदा खुल्या

दरम्यान, परिषदेने रक्तपेढ्यांमधील रक्ताच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांनी दान केलेले रक्त वाया जाणार नाही याची काळजी घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने परराज्यामध्ये रक्त पाठविण्यावरील तात्पुरती बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. मात्र परराज्यामध्ये रक्त हस्तांतरण करण्यापूर्वी आसपासच्या परिसरात आणि जिल्ह्यात पुरेसे रक्त उपलब्ध आहे, याची खात्री करूनच रक्त परराज्यात पाठवावे, अशी सूचना रक्तपेढ्यांना केल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या या निर्णयामुळे अतिरिक्त रक्त, रक्त घटक असलेल्या रक्तपेढ्यांना दिलासा मिळाला आहे. बंदी उठविल्यामुळे त्यांना राज्यासह परराज्यामध्ये रक्त पाठविणे शक्य होणार आहे.

Story img Loader