राज्य मंडळाच्या परीक्षा काही वर्षांत ऑनलाइन?

 शिक्षण विभागाची तंत्रज्ञानात्मक अपुरी तयारी करोनाकाळात  समोर आली. 

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाची स्थापना

मुंबई : करोनाकाळात दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यास ठाम नकार देणाऱ्या शिक्षण मंडळाने भविष्यात ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार सुरू केला आहे. परीक्षांसह विविध बाबींसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन करण्यात आला आहे.

 शिक्षण विभागाची तंत्रज्ञानात्मक अपुरी तयारी करोनाकाळात  समोर आली.  आता हा विभाग  ऑनलाइन पर्यायाचा विचार करत आहे. शिक्षण विभागाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा  प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाची स्थापना करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षा आणि मूल्यमापनासाठी यंत्रणा उभी करणे हा मंचाच्या अनेक हेतूंपैकी एक आहे. त्याशिवाय शिक्षकांचे प्रशिक्षण, प्रशासकीय कामकाज अशा विविध गोष्टींबाबत मंच अहवाल देणार आहे.  मंत्री, अधिकारी आणि खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली ही अभ्यास समिती तीन वर्षे कार्यरत असेल.

समितीत कोणत्या खासगी कंपन्या?

गूगल इंडिया, मायक्रोसॉफ्ट इंडिया, टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, डेल इंडिया, अमेझॉन, सीडॅक

मंचाचे हेतू

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन करून त्याचे मूल्यांकन करणे

  शिक्षकांचे मूल्यांकन करून गरजेनुसार प्रशिक्षण देणे

अनुदेशन व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे

शाळेच्या वर्गांपासून विविध कार्यालयांना माहिती तंत्रज्ञान सेवांशी जोडणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State board exams online in a few years akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या