मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने मात्र मोलनुपिराविर या करोना विषाणूवरील औषधांचा वापर करण्यास मान्यता दर्शविली असून त्याचा वापर सर्तकतेने करण्याच्या सूचना जिल्ह्यांना सोमवारी दिल्या आहेत.  केंद्रीय आरोग्य विभागासह भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मात्र या औषधाच्या वापराला विरोध दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 विषाणूचा एकदा शरीरात प्रवेश झाल्यानंतर वेगाने त्याची प्रतिरूपे तयार होतात. मोलनुपिराविर या विषाणूरोधक अन्टीव्हायरल गोळ्या असून हे विषाणूची प्रतिरुपे तयार होऊ न देण्याचे काम करत असून विषाणूला क्षीण करते. केंद्रीय आरोग्य विभागाने १७ जानेवारीला जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या औषधाचा समावेश केलेला नाही. तसेच आयसीएमआरनेही करोना उपचारांमध्ये त्याचा वापर न करण्याची शिफारस केली आहे. ओडिशासारख्या राज्यांनी बाजारात या औषधावर बंदी घातली आहे. या औषधाला अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळालेली नाही. परंतु वैद्यकीय चाचण्यांमध्ये या औषधामुळे रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचे आढळल्याने आपत्कालीन वापरास देण्यात आली आहे.  तज्ज्ञांच्या मतानुसार त्याचा राज्याच्या करोना उपचारविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्येही ६ जानेवारीला समावेश केला आहे. केंद्राने विरोध केल्यानंतरही राज्याच्या आरोग्य विभागाने याच्या वापराला संमती दर्शविली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State department of health corona virus drugs icmr molnupiravir akp
First published on: 20-01-2022 at 00:00 IST