राज्य नाटय़ स्पर्धा अंतिम फेरीतील पुनरुज्जीवित नाटकांवर आक्षेप

राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेली चार पुनरुज्जीवीत नाटके बाद करण्यात येऊन त्याजागी पुढील क्रमांकावरील नाटकांचा समावेश करण्यात यावा.

राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेली चार पुनरुज्जीवीत नाटके बाद करण्यात येऊन त्याजागी पुढील क्रमांकावरील नाटकांचा समावेश करण्यात यावा. तसेच पुनरुज्जीवीत नाटकांसाठी वेगळी स्पर्धा घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सांस्कृतिक कार्यसंचालक अजय आंबेकर यांना देण्यात आले आहे, अशी माहिती मराठी नाटय़ कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
संघातर्फे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काही नाटय़निर्मातेही उपस्थित होते. राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेसाठी नवीन नाटकाचीच संहिता असावी अशी अट असताना त्यात बदल करण्यात आला. मात्र, हा बदल सर्व नाटय़ निर्मात्यांपर्यंत पोचला नाही. त्यामुळे काही ठराविक निर्मात्यांचीच पुनरुज्जीवीत नाटके स्पर्धेत सादर झाली.
आता अंतिम फेरीसाठी दाखल झालेली चार पुनरुज्जीवीत नाटके स्पर्धेतून बाद केली जावीत आणि त्या जागी पुढच्या क्रमांकावर असलेल्या नाटकांना अंतिम फेरीत प्रवेश द्यावा. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचीही लवकरच भेट घेऊनत्यांना निवेदन देणार आहोत. याबाबत कार्यवाही झाली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही कबरे यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून राज्यातील वृद्ध कलाकारांना देण्यात येणारे हे मानधन अपुरे असून ते किमान पाच हजार रुपये करण्यात यावे, नाटय़ निर्मात्यांनी आपल्या नाटकातील कलाकार या संघटनेचा सदस्य आहे की नाही त्याची खात्री करावी, वृद्ध कलावंताना अडी अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करता यावी, यासाठी संघटनेकडून ठोस निधी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीप्रत्येक लहान-मोठय़ा कलाकाराने किमान वर्षांतील आपल्या एका प्रयोगाचे मानधन या संघटनेस द्यावे, असे आवाहनही कबरे यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State drama competition

ताज्या बातम्या