scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय शिबीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे येत्या ४ व ५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय शिबीर
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे येत्या ४ व ५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  दिली.

राज्यात महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याबाबत पक्षांतर्गत विषय आणि सद्य राजकीय परिस्थिती यावर  चर्चा करण्यासाठी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे बैठक पार पडली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, या बैठकीत राज्यातील  विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरदेखील चर्चा झाली. शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिराविषयीही चर्चा झाली. या शिबिराला राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या