पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार पवई येथे घडला. याप्रकरणी पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार संजय सानप (५२) पवई पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या मोबाइल – ५ या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पथक पवई परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पवई परिसरात पती पत्नीला मारहाण करीत असल्याचा दूरध्वनी त्यांना नियंत्रण कक्षाकडून आला. त्यानुसार ते पवईतील गौतम नगर येथे पोहोचले. त्यावेळी महिलेने पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तुपाचा घोटाळा? ‘महिन्याभरात चौकशी पूर्ण करणार’, फडणवीसांची घोषणा!

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

त्यामुळे पोलीस पथकाने महिला व तिच्या पतीला गाडीत बसवले व ते पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अचानक समोर आलेल्या व्यक्तीने वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे वाहनाच्या काचेचे नुकसान झाले. पोलिसांनी वाहनाची पाहणी करून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तो घटनास्थळावरून पडून गेला. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव अजय अग्रवाल असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागवली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. सानप यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.