scorecardresearch

‘स्टोरी टेल’वर ‘एप्रिल पुल’; ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात ऐकण्याची संधी

वाचकांना अधिकाधिक साहित्य ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्टोरी टेल मराठी’ने एप्रिल महिन्यात ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Story Tale Marathi PL Deshpande
'स्टोरी टेल'वर 'एप्रिल पुल'; ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात ऐकण्याची संधी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

मुंबई : गेल्या काही वर्षांत पुस्तके वाचण्याबरोबरच कथा ऐकण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे. वाचकांना अधिकाधिक साहित्य ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्टोरी टेल मराठी’ने एप्रिल महिन्यात ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्टोरी टेल मराठी’वर ‘एप्रिल पुल’ या नावाने एप्रिल महिन्यात दर आठवड्याला ‘पुल’चे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात ‘ऑडिओ बुक’ स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. याची सुरुवात १ एप्रिल रोजी ‘पुल’च्या ‘गुण गाईन आवडी’मधील काही लेखांपासून होणार आहे. तर
४ एप्रिल रोजी ‘मैत्र’ हे ऑडिओ बुक प्रकशित होणार आहे. या कथा कोणाच्या आवाजात ऐकता येतील याची माहितीही दरवेळी ‘स्टोरी टेल’वर देण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबईत आणखी ६० ठिकाणी स्वयंचलित हवामानदर्शक सयंत्र बसविणार; कुठे किती पाऊस पडला याची अचूक माहिती मिळणार

हेही वाचा – मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर! ‘हे’ आहे कारण

१ एप्रिल रोजी ‘गुण गाईन आवडी’मधील ‘माझे एक दत्तक आजोबा’, ‘डॉ लोहिया : एक रसिक तापस’, ‘मंगल दिन आज’ या, तर ४ एप्रिल रोजी ‘मैत्र’मधील ‘नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले’, ‘शाहू महाराज : एक धिप्पाड माणूस’, ‘हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार’, ‘जीवन त्यांना कळले हो’, ‘जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया’ या कथांचा समावेश आहे. ही सर्व ‘ऑडिओ बुक्स’ लोकप्रिय अभिनेता सौरभ गोगटे यांच्या आवाजात आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या