तक्रारीनंतरही मुंबई पोलिसांचे दुर्लक्ष

मुंबई : माहीमच्या हिंदुजा रुग्णालयापासून शिवाजी पार्क येथील तरण तलावापर्यंतचा किनारा रस्ता अमलीपदार्थ, मद्यसेवनाचा नवा अड्डा बनला आहे. करोनाकाळातही येथे मद्यपींची गर्दी जमत असून याबाबत करण्यात येणाऱ्या तक्रारीही दुर्लक्षित राहात आहेत. या मद्यपाटर्य़ामुळे या मोकळय़ा रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना मात्र मनस्ताप होत आहे.

माहीम परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यक्तीने आठवडय़ापूर्वी किनारा रस्त्यावर सुरू असलेल्या खुलेआम दारूपाटर्य़ा, अमली पदार्थाचे सेवन, युगुलांचे अश्लील चाळे याबाबत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर तक्रोर के ली होती. मात्र मुंबई पोलिसांनी त्यास प्रत्युत्तरही दिले नाही आणि किनारा रस्त्यावरील कृ तीही थांबल्या नाहीत. दोन दिवस वाट पाहून तक्रोरदाराने दुसरे ट्वीट मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांना के ले. तेव्हा मात्र मुंबई पोलिसांतर्फे याबाबत माहीम पोलीस ठाण्यास कळवू, असे उत्तर लगोलग दिले गेले.

ट्वीट करून आठवडा लोटला तरी किनारा रस्त्यावरील परिस्थिती बदललेली नाही, असा दावा तक्रोरदार व्यक्तीने ‘लोकसत्ता’कडे के ला. पुराव्यासाठी तक्रोरदाराने किनारा रस्त्यावरील परिस्थिती दर्शवणारी ध्वनिचित्रफीत काढली. त्यात मुखपट्टी न लावलेल्या तरुणांचे घोळके  धक्क्यावर बसलेले आढळतात. याशिवाय किनाऱ्यावरील काँक्रीटच्या शिळांवरही मद्यपींचा मुक्तसंचार आढळतो.  याबाबत माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी किनारा रस्त्यावरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. येथे पूर्णवेळ बंदोबस्त ठेवण्याइतपत मनुष्यबळ नाही. त्यामुळे येथील गस्त वाढविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.