मुंबई : वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांकडून मोठ्या प्रमाणावर रँगिगविषयक तक्रारी करण्यात येत आहेत. त्यात मानसिक छळाच्या प्रकरणांबरोबरच आत्महत्येच्या घटनांचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेत वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था विनियम २०२१ मधील रॅगिंग प्रतिबंध आणि प्रतिबंधातील तरतुदींचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांना दिला आहे.

पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या रँगिगला आळा घालण्यासाठी आणि रॅगिंग होणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ॲंटी-रॅगिंग सेल आणि अँटी-रॅगिंग हेल्पलाइन सुरू केली आहे. यावर मागील काही दिवसांपासून तक्रारींची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर काही प्रकरणे समाजमाध्यम व वृत्तपत्रातून उघडकीस येत आहेत. या प्रकरणांमध्ये छेडछाड, बळजबरी, मानसिक छळ या प्रकरणांबरोबरच आत्महत्येच्या घटनांचाही समावेश आहे. त्यातच नुकतेच धारपूर येथील जीएमईआर वैद्यकीय महविद्यालयात रॅगिंग प्रकरणातून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रॅगिंगविरोधी उपायांची तातडीने कठोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला

रगिंगला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नियमावली तयार केली आहे. मात्र त्याची अमलबजावणी होत नसल्याचे वाढत्या प्रकरणातून निदर्शनास आले आहे. महाविद्यालयांमधील अपुरी देखरेख यंत्रणा, रॅगिंगविरोधी पथकांची अनुपस्थिती, महाविद्यालयांकडून सादर होत नसलेला रॅगिंगविरोधी वार्षिक अहवाल, प्रभावीपणे रॅगिंग निर्मूलनासाठी पुढाकार घेण्यात अपयशी ठरलेली महाविद्यालये आदी विविध कारणांमुळे रॅगिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेत आयोगाने नुकतेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था विनियम २०२१ मधील रॅगिंग प्रतिबंध आणि प्रतिबंधातील तरतुदींतील नियमांचे पालन न केल्यास महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय अयुर्विज्ञान आयोगाने सर्व महाविद्यालयांना दिला.

हेही वाचा – मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन

रॅगिंगला आळा घालण्यासाठी केल्या सूचना

रॅगिंगविरोधी यंत्रणा मजबूत करण्यासाठी पथके तयार करावी, रॅगिंगविरोधी धोरणांबद्दल प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी, वार्षिक अहवाल वेळेवर सादर करावा, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या छळापासून मुक्त आणि शिक्षणासाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण तयार करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

Story img Loader