Striving to strengthen Congress Kharge role presidential election ysh 95 | Loksatta

काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका

काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे(PTI)

मुंबई : काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधीसमोर आपली भूमिका मांडताना ही  निवडणूक व्यक्तिगत नाही, माझा सामूहिक नेतृत्वावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे यांनी टिळकभवन येथे प्रदेश प्रतिनिधींशी संवाद साधला. 

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आपण का लढवीत आहोत, त्याची पार्श्वभूमी सांगताना खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे, अशीच माझी भूमिका होती. मी तशी सोनिया गांधी यांना विनंती केली. परंतु गांधी कुटुंबातील कुणीही अध्यक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी माझी भेट घेऊन मला अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याची विनंती केली. मी ती मान्य केली. या देशात काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे, तसेच उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पटोले यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्यात कटकारस्थान करून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने शुक्रवारी शंभर दिवस पूर्ण केले. परंतु या शंभर दिवसांत सरकारने काय केले? सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदारच खुलेआम गुंडगिरीची भाषा करू लागले आहेत, कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्ला चढविला. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे हित पाहणारे हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण

संबंधित बातम्या

आदित्य यांचे मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान; ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाचा वाद
फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली
कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काय? ; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला सवाल
पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेत आणल्यास राज्याचा पाठिंबा!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जिममध्ये खतरनाक व्यायाम; दोन्ही पाय हवेत नेले अन…
IPL 2023 Auction: आयपीएल लिलावात ह्यूग एडमीड्स सांभाळणार लिलावकर्त्याची जबाबदारी, स्वत:च केला खुलासा
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
“…आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश”; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”