मुंबईः बोरिवली परिसरात १२ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याचा शुक्रवारी अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तूरबा मार्ग पोलिसांनी आरोपी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. विकी कनोजिया (१२) असे मृत मुलाचे नाव असून तो बोरिवली येथील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता.
हेही वाचा – मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
बोरिवली पूर्व येथील कार्टर रोड क्रमांक ३ येथे दुपारी १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. मुलाने शाळेचा गणवेश परिधान केला होता. मुलगा रस्ता ओलांडत असताना रस्त्यामध्ये एक ट्रक उभा होता. ट्रकच्या मागून रस्ता ओलांडत असताना अचानक समोर डंपर आला. त्यावेळी मुलाचा तोल गेला व तो खाली कोसळला. त्यावेळी मुलाचे डोके डंपरच्या चाकाखाली आले. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या डंपर चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने त्याला ताब्यात घेण्यात आले. मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.