scorecardresearch

परळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची पोलिसांकडे ‘रॅगिंग’ची तक्रार

 तक्रारदार हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो ऑक्युपेशनल थेरपीचे शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार २०१८ पासून आतापर्यंत हा प्रकार सुरू आहे.

मुंबई: परळ येथील केईएम रुग्णालयातील सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलिसांनी १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दोन वॉर्डनचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींची तपासणी करण्यात येणार आहे.

 तक्रारदार हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो ऑक्युपेशनल थेरपीचे शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार २०१८ पासून आतापर्यंत हा प्रकार सुरू आहे. आरोपी विद्यार्थी तक्रारदार विद्यार्थ्याला त्रास देत असून जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार विद्यार्थ्याला कपडे धुवायला लावणे, भांडी घासायला लावणे, कपड्यांच्या घड्या करायला लावणे, झाडू मारायला लावणे, वर्गात जबरदस्तीने उठायला भाग पाडले, अशी कामे करून घेऊन त्याला मारहाण केली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

याप्रकरणी महाविद्यालयाकडून रॅगिंगबाबत चौकशी करणारी समिती स्थापन करण्यात आली होती. ‘आम्ही नियमाप्रमाणे रॅगिंग समितीमध्ये या प्रकरणाची चौकशी केली असून यात भोईवाडा पोलिसही सहभागी होते. त्यात र्रँगग झाल्याचा पुरावाही आढळलेला नाही, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student of a medical college in parel has lodged a complaint with the police akp

ताज्या बातम्या