scorecardresearch

‘केईएम’मधील २९ विद्यार्थ्यांना करोना

रुग्णालयात शिकणारे एकूण ९०० विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी एकत्र येतात.

‘केईएम’मधील २९ विद्यार्थ्यांना करोना

दोन्ही लसमात्रांनंतरही संसर्ग; वसतिगृहांतील ९०० जणांच्या चाचण्या

मुंबई : केईएम रुग्णालयात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारे २९ विद्यार्थी करोनाबाधित झाल्याचे समोर आले. या सर्व विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही त्यांना संसर्ग झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून रुग्णालयातील ९०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. बाधितांमधील एक विद्यार्थी मुंबईत राहणारा असून अन्य विद्यार्थी रुग्णालयाच्या वसतिगृहांत राहत असल्यामुळे चिंता अधिक आहे.

 रुग्णालयात शिकणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बहुतांश विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. एका विद्याथ्र्यात  लक्षणे आढळल्यामुळे त्याला मरोळच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात शिकणारे एकूण ९०० विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी एकत्र येतात. तसेच हे सर्व विद्यार्थी केईएमच्या विविध ठिकाणी असलेल्या सहा वसतिगृहांमध्ये राहतात. यातील तीन वसतिगृहांमध्ये बाधित आढळले आहेत. त्यामुळे सतर्कता म्हणून उर्वरित विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यास सुरुवात केली असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

लसवंत असूनही…

बाधित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या दोन लसमात्रा पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र चाचण्यांमध्ये त्यांना करोना असल्याचे आढळले. त्यानंतर काळजी म्हणून आता वसतिगृहात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या

वर्षाचे विद्यार्थी रुग्णसेवेसाठी वॉर्डमध्ये जात नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णांमार्फत संसर्ग होण्याची शक्यता नाही. या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य आरोग्य कर्मचारी बाधित झाल्याचे आढळलेले नाही.  – डॉ. हेमंत देशमुख,  अधिष्ठाता केईएम

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Study of medicine at kem hospital 29 students coronated akp

ताज्या बातम्या