scorecardresearch

Premium

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरण : वकील नीलिमा चव्हाण यांची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

मोरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

sudhir more suicide case lawyer nilima chavan moves high court for anticipatory bail
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील नीलिमा चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहेत. तसेच, अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मोरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांना मौल्यवान सामान सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी ‘डिजी लॉकर्स’,महत्त्वाच्या स्थानकात डिजी लॉकरच्या संख्येत वाढ

Sanjay SIngh
आप खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, मद्य घोटाळ्याप्रकरणी १० तासांच्या चौकशीनंतर कारवाई
MLA Jitendra Awad alleged eight floor illegal buildings constructed Mumbra two months
मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Sanjay Raut
“कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र
Narendra modi welcome after g20 summit
अन्वयार्थ : आभासी उत्सवाला वास्तवाचा धक्का!

मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चव्हाण यांनी आपल्या वडिलांचा छळ केल्याचा आरोप मोरे यांच्या मुलाने केला होता. तसेच, पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चव्हाण यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir more suicide case lawyer nilima chavan moves high court for anticipatory bail mumbai print news zws

First published on: 16-09-2023 at 23:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×