मुंबई : राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७३ सहकारी आणि ७० खासगी, अशा जेमतेम १४३ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गतवर्षी एकूण २०७ कारखान्यांनी गाळप केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी कारखाने सुरू झाले आहेत.

साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील २०७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात १७९ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते. त्यानंतर आणखी सात, अशा १८६ कारखान्यांना परवाने दिले आहेत. पाच कारखान्यांचे प्रस्ताव प्रादेशिक स्तरावर अडकले आहेत. त्यामुळे साखर आयुक्तालयाकडून एकूण १८६ कारखान्यांना गाळपासाठी परवाने दिले असले तरीही पाच डिसेंबरअखेर १४३ कारखान्यांची गाळप सुरू केले आहे. मागील वर्षी १०३ सहकारी, १०४ खासगी, अशा २०७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. साखर आयुक्तालयाने परवाने देऊन गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढलेली दिसत नाही.

Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rapid hair loss and baldness are caused by increased nitrate levels in water
केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!
Thane Municipal Corporation, action against unauthorized boards,
ठाणे महापालिकेची सुमारे चार हजार अनधिकृत फलकांवर कारवाई, तर ७६ गुन्हे दाखल
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
pimpri chinchwad municipal corporation administrative regime
प्रशासकीय राजवटीत विकासकामांना खीळ, पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ९०० कोटी शिल्लक; नऊ महिन्यांत केवळ ३७ टक्के रक्कम खर्च
nagpur municipal corporation launched ambitious plan to waive 80 percent of late fees on water tax bills
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात
Panvel municipal Corporation, air pollution, year 2024
पनवेलमध्ये यंदा प्रदूषण नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा

हेही वाचा – डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयाच्या तत्कालीन विभागप्रमुखांना आरोपी करा, सरकारी पक्षाची विशेष न्यायालयाकडे मागणी

विदर्भात धुराडी बंदच

राज्यातील १४३ कारखान्यांनी पाच डिसेंबरअखेर १०५.४७ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ७.६४ टक्के साखर उताऱ्याने साडेआठ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर साखर विभागातील साखर उतारा सर्वांधिक असून, नऊ टक्क्यांवर गेला आहे. नागपूर साखर विभागात अद्याप धुराडे पटले नाही. गत हंगामात चार खासगी कारखाने सुरू होते. यंदा एकही कारखाना सुरू झालेला नाही. अमरावती विभागातही गतवर्षी चार कारखाने सुरू होते, यंदा यवतमाळमधील डेक्कन शुगर प्रा. लि. मंगळूर हा एकच खासगी कारखाना सुरू झाला आहे. हा अपवाद वगळता विदर्भातील सर्व कारखान्यांची धुराडी बंद आहेत.

हेही वाचा – दुसर्‍या टप्प्यात पाॅड टॅक्सीची शीव रेल्वे स्थानकापर्यंत धाव, १६ स्थानकांचा समावेश

गाळप क्षमता वाढली

गाळप परवानगीसाठी साखर आयुक्तलयाकडे अर्ज केलेल्या बहुतेक कारखान्यांना परवाने दिले आहेत. ज्या कारखान्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्या पूर्ण करून कारखान्यांना परवाने दिले जात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ झाली आहे, अशी माहिती साखर सहसंचालक महेश झेंडे यांनी दिली.

Story img Loader