मुंबई: मानखुर्दमध्ये तरुणीची आत्महत्या | Suicide of a young woman in Mankhurd mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: मानखुर्दमध्ये तरुणीची आत्महत्या

मानखुर्दच्या मंडाला परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबई: मानखुर्दमध्ये तरुणीची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र

मानखुर्दच्या मंडाला परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास लावून आत्महत्या केली. संगीता यादव असे या तरुणीचे नाव असून याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करीत आहेत.मानखुर्द – मंडाला येथील शिवनेरी नगर परिसरात संगीता कुटुंबियांसह राहात होती. शनिवारी ती घरात एकटी असताना तिने गळफास लावून आत्महत्या केली.

हेही वाचा >>>मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संगीताला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनास्थळी पोलिसांना कुठल्याही प्रकारची चिट्ठी सापडली नाही. त्यामुळे संगीताने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:50 IST
Next Story
Central Railway: मध्य रेल्वेवरील १४ वातानूकुलीत लोकल फेऱ्या रद्द