Mumbai Crime : मुंबई सूटकेस हत्याकांड (Mumbai Crime ) प्रकरणात दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी चार तासांत अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी मूक बधिर असल्याने गुन्हा कबूल करुन घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी साईन लँग्वेज एक्स्पर्ट्शी मदत घेऊन या गुन्ह्याची उकल केली. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ११ येथे दोन मूक बधिर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये ( Mumbai Crime ) चढत होते. या दोघांकडे चाकं असलेली एक ट्रॉली बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही बॅग रेल्वे गाडीत चढवताना चांगलाच घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह ( Mumbai Crime ) कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह ( Mumbai Crime ) अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) याचा असल्याचे समजलं. आता अर्शद अली सादिक शेखची हत्या का आणि कशी झाली? ते समोर आलं आहे. आरोपी पायधुनीतून दादरला आले होते. दादर स्टेशनवर जीआरपींनी ही केस पायधुनीकडे वर्ग केली. अर्शद याची हत्या ( Mumbai Crime ) शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा यांनी का केली? हे आता समोर आलं आहे.

A case has also been filed by ED in the Religare case mumbai news
मुंबई: रेलिगेअर प्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
cops raid bangur nagar hotel arrested 6 in dating app scam
डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक; सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी
Six people arrested , dating app fraud case,
डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक, सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी
Kalyaninagar accident case
कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
The High Court acquitted three doctors in Bandra West in the death of a minor girl who performed surrogacy Mumbai news
स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे प्रकरण: तीन डॉक्टर प्रकरणातून दोषमुक्त
Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर

हे पण वाचा- Mumbai Crime: दादरच्या ‘सूटकेस मर्डर’ची इनसाईड स्टोरी, “आरोपी मूक बधिर, टॅक्सीने आले आणि…”

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवजीत सिंग, प्रवीण चावडा या दोघांनी त्यांचा मित्र अर्शद अली शेख याला पार्टी करण्यासाठी पायधुनी या ठिकाणी बोलवलं. रविवारी म्हणजेच ४ ऑगस्टला हे तिघे भेटले. तिघांनी एकत्र मद्यपान केलं. त्यानंतर अर्शद शेखची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. अर्शदला ठार केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची ( Mumbai Crime ) विल्हेवाट सिंग आणि चावडा या दोघांनी लावण्याचा प्रयत्न केला. कोकणात जाऊन त्याचा मृतदेह फेकायचा किंवा पुरुन टाकायचा असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी सूटकेसमध्ये अर्शदचा मृतदेह भरला आणि तुतारी एक्स्प्रेस पकडली होती. मात्र पोलिसांनी त्यांना हटकलं आणि सगळा प्रकार उघड झाला.

Mumbai Crime
मुंबईतल्या सूटकेस मर्डरची इनसाईड स्टोरी समोर

महिलेचे फोटो, ब्लॅकमेलिंग आणि..

पोलिसांनी पुढे असंही सांगितलं या तिघांपैकी दोघांचं एकाच महिलेवर प्रेम होतं. मात्र या महिलेने दोघांनाही प्रतिसाद दिला नव्हता. तसंच चावडाच्या गर्लफ्रेंडचे फोटो दाखवून अर्शद त्याला ब्लॅकमेल करत होता. या तिघांमध्ये चांगली मैत्री होती मात्र रविवारी मद्यपान केल्यानंतर तिघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात दोघांनी अर्शदला संपवलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.