मुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गांवर
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल.
हेही वाचा – मुंबई : मानखुर्द टी जंक्शनवर उड्डाणपूल बांधणार, वाहतूक कोंडी टळणार
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गांवरील लोकल धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल वांद्रे/दादर स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.