रेल्वेमार्गावरील अभियांत्रिकी कामांसाठी या रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसून या मार्गावरील सर्व सेवा सुरळीत धावतील. मात्र हार्बर तसेच पश्चिम मार्गावर मेगाब्लॉकमुळे काही सेवा रद्द राहतील. तर सर्वच सेवा वेळापत्रकापेक्षा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावतील. तरी प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच ब्लॉक असलेल्या मार्गावरील प्रवास शक्यतो टाळावा.

हार्बर मार्ग
* कुठे – सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते माहीम अप आणि डाउन मार्गावर
* कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वा.
* परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अंधेरी यांदरम्यान एकही सेवा धावणार नाही. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी पनवेल ते कुर्ला यांदरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे
* कुठे – बोरिवली ते गोरेगाव यांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर
* कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
* परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सर्व गाडय़ा बोरिवली ते गोरेगाव यांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील. तसेच ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन मार्गावर धावणाऱ्या सर्व जलद गाडय़ा अंधेरी ते बोरिवली यांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच ब्लॉकमुळे काही सेवा रद्द राहतील.