शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेशन कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. यावर आता संजय राऊत यांचे लहान भाऊ सुनिल राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच राऊत भाजपाविरोधात बोलल्याने त्यांना ही शिक्षा दिली जात असल्याचा आरोप केला. ते सोमवारी (१ ऑगस्ट) न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.

सुनिल राऊत म्हणाले, “रविवारी सकाळी साडेसात वाजता माझ्या आणि संजय राऊत यांच्या घरी आले. त्यानंतर ते साडेचार वाजेपर्यंत ते चौकशी करत होते. ते ५ वाजता आम्हाला ईडीच्या कार्यालयाकडे घेऊन आले. साडेपाच-सहा वाजता आम्ही ईडी कार्यालयात पोहचलो. रात्री १२.४० मिनिटांनी ईडीने अटक केले असं सांगितलं.”

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

“न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे”

“आज सकाळपासून आम्ही न्यायालयात त्यांची वाट पाहत होतो. साडेबारा-पावणे एक वाजता त्यांना जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांना सेशन कोर्टात आणण्यात आले. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीने त्यांच्याकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली. ४ ऑगस्टला त्यांना परत न्यायालयासमोर हजर करतील,” असं सुनिल राऊत यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : Photos : सकाळी सात वाजता घरात, १० तास चौकशी, दिवसभरात ईडीकडून संजय राऊतांवर नेमकी काय कारवाई? वाचा…

“संजय राऊतांना केवळ भाजपाविरोधात बोलल्याची शिक्षा”

“मला विश्वास आहे संजय राऊत यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांना केवळ भाजपाविरोधात बोलल्याची शिक्षा दिली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्यासाठी राऊतांना अटक करण्यात आली. मला खात्री आहे की, न्यायव्यवस्था आपलं काम चोखपणे करेल आणि संजय राऊतांना न्याय मिळेल,” असंही राऊतांनी नमूद केलं.