शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला रविवारीपासून सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मेळावे सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी विक्रोळी झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी न्यायालयात संजय राऊतांच्या भेटीदरम्यानचा प्रसंग सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले “भविष्यात…”

काय म्हणाले सुनील राऊत?

“आज संजय राऊत यांना न्यायालयात आणलं होतं. त्यावेळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा एका व्यक्तीने संजय राऊतांना म्हटलं की, ‘तुम्ही माघार घेतली असती तर आज घरी असते’. मात्र, ‘वरती गेल्यावर मला बाळासाहेबांना गद्दार म्हणून तोंड दाखवता आलं नसतं.’ असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. आज जे ४० गद्दार शिवसेना सोडून गेले, त्यांनी शिवसेना नाव संपुष्टात आणलं”, अशी टीका सुनील राऊत यांनी केली.

हेही वाचा – धनुष्यबाण चिन्ह परत मिळावं म्हणून ठाकरेंची उच्च न्यायालयात याचिका; उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निकाल…”

“संजय राऊत यांची काहीही चूक आहे. एक रुपयांचा भ्रष्टाचार संजय राऊत यांनी केला नाही. माझ्याकडे चार्जशीट आहे. हवं तर कोणत्याही वकिलाला नेऊन दाखवा. तो हेच म्हणेल की, संजय राऊतांवर गुन्हा दाखल होणार नाही. मात्र, तरीही संजय राऊत जेलमध्ये आहे. कारण ते भाजपासमोर झुकले नाहीत. त्यांनी भाजपाच्या अत्याचारी धोरणांविरोधात नेहमी आवाज उठवला”, असा आरोपही त्यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil raut told about incident in court with sanjay raut spb
First published on: 11-10-2022 at 10:33 IST