scorecardresearch

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक : वडेट्टीवार

राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील आघाडी सरकारची कोंडी झाली आहे.

मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया  इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

निकालाचा अभ्यास करू- भुजबळ

या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून राज्य सरकार पुढील पावले टाकेल. या निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा एक राज्य सरकारसमोर पर्याय असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supreme court verdict shocking vadettiwar endemic swarajya institutions elections process obc reservation ysh

ताज्या बातम्या