scorecardresearch

शतकांचं शतक झळकावणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटपटूचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

एकूण १०१ शतके करून विक्रमी कामगिरी केली आहे.

शतकांचं शतक झळकावणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटपटूचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंडर १६ वयोगटात मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या एका तरुण धडाकेबाज खेळाडूचे कौतुक केले आहे. अभिज्ञान कुंडू असे या क्रिकेटपटूचे नाव असून त्याने विक्रमी कामगिरी केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले.

“तरुण क्रिकेटपटू अभिज्ञान अभिषेक कुंडू याने मुंबई अंडर १६ वयोगटातील मुंबई संघाकडून खेळताना विक्रमी कामगिरी केली.त्याने एकूण १०१ शतके केली असून यामध्ये ११ द्विशतके तर दोन चार शतके तर दोन त्रिशतकांचा देखील समावेश आहे. त्याने आज प्रशिक्षक रयत क्रिकेट क्लबचे चेतन जाधव व अमित यादव यांच्या सोबत भेट घेतली. यावेळी त्याचे या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.” अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी ट्वीटर आणि फेसबुकद्वारे अभिज्ञानच्या फोटोसह शेअर केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या