अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी हा नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. अनमोलने Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक क्रिशा शाहशी रविवारी सप्तपदी घेतल्या आहेत. त्यांच्या लग्नात बॉलिवूड चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा लग्नाला हजेरी लावली. या लग्नसोबळ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सुप्रिया यांनी हे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. एका फोटोत सुप्रिया यांच्यासोबत क्रिशा आणि जय अनमोल दिसतं आहेत. त्यासोबत त्यांनी आणखी बरेच फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. दरम्यान, जय अनमोल आणि क्रिशाच्या लग्नाला श्वेता बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि नव्या नवेली नंदासोबत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती. अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल इथल्या परिसरातील आलिशान घरात हा लग्नसोहळा पार पडला.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आणखी वाचा : Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री इस्लामच्या वाटेवर, ग्लॅमर विश्व सोडून हिजाब परिधान करण्याचा घेतला निर्णय

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

दरम्यान, अंबानी यांची सून कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबईत राहणारी क्रिशा ही सामाजिक कार्यकर्ती आणि एक उद्योजिका आहे. Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची ती संस्थापक आहे. क्रिशा ही युकेमधील अक्सेंचर या कंपनीत काम करत होती. मात्र भारतात परतल्यानंतर तिने स्वत:ची कंपनी स्थापन केली. क्रिशाने Mental Health विषयी एक मोहीमसुद्धा सुरु केली आहे. ‘#Lovenotfear’ असं या मोहिमेचं नाव आहे. क्रिशाने कॅलिफोर्निया विद्यापिठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.