scorecardresearch

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प: तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई – विरार आणि मिरा – भाईंदर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे.

Tungareshwar tunnel completed
४.६ किमीचे भुयारीकरण पूर्ण करत १८ महिन्यांनंतर टीबीएम मशीन बाहेर (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई – विरार आणि मिरा – भाईंदर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्प्या शुक्रवारी पूर्ण करण्यात एमएमआरडीएला यश आले. या प्रकल्पातील चारपैकी सर्वात मोठ्या ४.६ किमी लांबीच्या तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. भुयारीकरणाचे काम पूर्ण करून १८ महिन्यांनंतर टीबीएम यंत्र भूगर्भातून बाहेर काढण्यात आले. दुसरा टप्पा मे २०२४ मध्ये पूर्ण होणार असून हे काम पूर्ण झाल्यास मिरा-भाईंदर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

वसई-विरार आणि मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १३२५.७८ कोटी रुपये खर्चाचा सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४०३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. काम सुरू झाल्यापासून ३४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि इतर अडचणींमुळे काम संथ गतीने सुरू होते. परिणामी, या प्रकल्पला विलंब झाला. मात्र २०२१ नंतर एमएमआरडीएने कामाला गती दिली. त्यामुळेच जून २०२३ मध्ये या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता केवळ या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यास वसई-विरार परिसराला दर दिवशी १८५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा-मध्य रेल्वेवर ‘स्वच्छता पंधरवडा’; स्थानके, कार्यालयांच्या स्वच्छतेसह होणार जनजागृती

आता एमएमआरडीएने दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या टप्प्यातील काम मे २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सूर्या प्रकल्पात एकूण चार बोगदे असून यातील दोन बोगदे अगदी छोटे आहेत, तर पहिल्या टप्प्यातील मेढवणखींड बोगदा १.७ किमी लांबीचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा सर्वात मोठा ४.६ किमी लांबीच्या तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या बोगद्याच्या भुयारीकरणासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये टीबीएम यंत्र भूगर्भात सोडण्यात आले होते. मार्चपासून प्रत्यक्ष भुयारीकरणास सुरुवात झाली. आता १८ महिन्यांनी भुयारीकरण पूर्ण करून टीबीएम यंत्र शुक्रवारी भूगर्भातून बाहेर काढण्यात आले. अभियंता दिनाच्या दिवशी भुयारीकरण पूर्ण करून टीबीएम बाहेर आल्याने अभियंत्यांनी, कामगारांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान, आता बोगद्यातील अंतर्गत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अन्य दोन छोट्या बोगद्यांच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहेल. दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे मे २०२४ पर्यंत करून मिरारोड-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×