“आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत बोलताना शिंदे सरकार ३२ वर्षाच्या नेत्याला घाबरले असे सांगतात, पण तू ३२ वर्षांचा झाला आहे, तुझ्या आई-वडीलांना लग्न लावून द्यायला सांग”, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरेंवर केली होती. या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या वरळीत ठाकरे गटाच्या ‘शिवसैनिक निर्धार मेळाव्या’त बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा-शिंदे गटावरही जोरदार टीकास्र सोडलं.

हेही वाचा – मी तुमच्याविरोधात ठाण्यातून लढतो; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

भाजपाने काही लोकांना सुपाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये काही बंद पडलेल्या इंजिनाचेही लोकं बोलत राहतात. ते म्हणतात, ”आदित्य ठाकरेंनी लग्न केलं नाही, राहुल गांधींची दाढी किती वाढली आहे बघा”, मुळात त्यांचा पक्ष एवढा बंद पडला आहे का, की आता तुम्ही वधू-वर सूचक मंडळ काढणार आहात? किमान आम्हाला स्पष्टपणे सांगा तरी की आम्ही आमचा पक्ष पूर्णपणे बंद करून वधू-वर सूचक मंडळ काढलं आहे आणि त्याच्या संचालकपदी प्रकाश महाजनांची नेमणूक केली आहे, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारेंनी दिलं.

सुषमा अंधारेंचं शिंदे गटावर टीकास्र

यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावरही जोरदार टीकास्र सोडलं. “शिंदे गटाचे नेते शिवसेनेतून पडण्याची जी कारणे सांगत होते, त्यातलं एकही कारण खरं नव्हतं. नंतर म्हणाले, आम्ही हिंदुत्त्वासाठी गेलो. पण एकाही कारणावर हे लोक स्थिर राहत नाही. कारण त्यांचे मन खात आहे. प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं की, शिवसैनिकांना काय सांगितल्यावर त्यांना पटेल की आम्हीच खरे आहोत. आता त्यांनी नवं कारण काढलं आहे. आता जर मराठा मुख्यमंत्र्यांचे कारण पुढे करत असतील तर आधीची सर्व कारणं खोटी होती. असं असेल तर एका अर्थाने ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याचीही दखल घ्यावी लागेल.”, अशीही टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“उद्धव ठाकरे तुम्हाला लाईनवर आणतील”

“एवढं सगळं होऊनही आमच्याकडे इनकमिंग सुरु आहे. वरळीच्या या सभेत आमच्याकडे एकही खुर्ची रिकामी नाही. आमच्याकडे खुर्च्या गुंडाळण्याची वेळ आलेली नाही. कसब्यात तुम्हाला गल्लीबोळात फिरायला भाग पाडले. तुमच्या स्तरावर आमचा नेता येणार नाही. उद्धव ठाकरेंना ममता बॅनर्जी, स्टॅलिन फोन करत आहेत. केजरीवाल तर भेटायलाच आले. उद्धव ठाकरे ऑनलाईन आहेत की ऑफलाईन, यावर बोलण्याआधी उद्धव ठाकरे तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी खंबीर आहेत.”, असे आव्हानही सुषमा अंधारे यांनी दिले.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना अजित पवारांकडून मनसेचा उल्लेख; म्हणाले “आमदार म्हणतील पक्ष आमचा, इंजिन चिन्हही…”

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले होते?

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लग्नाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. “आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत बोलत असताना ३२ वर्षाच्या नेत्याला घाबरले असे सांगतात. तू ३२ वर्षांचा झाला असल्यास तुझ्या आई-वडीलांना लग्न लावून द्यायला सांग. लग्न लावले नसल्यामुळे माणसाची गडबड होते. आमचं लग्न झाल्यामुळे आम्हाला घरचा धाक असतो. पण याला काहीच धाक नाही. ती दिशा गेली पटण्याला ती परत आलीच नाही. आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत ३२ वर्षांचा झालो सांगतायत, त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी त्याच्याकडं लक्ष द्यावं”, असे ते म्हणाले होते.