रियाज काझी न्यायालयीन कोठडीत

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात अटके त असलेले निलंबित पोलीस अधिकारी रियाज काझी यांना न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काझी यांना ११ एप्रिलला अटक के ली. मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्ह््यात सक्रि य सहभाग आणि पुरावे नष्ट के ल्याचा आरोप एनआयएने काझी यांच्यावर ठेवला आहे. अटके नंतर त्यांना पोलीस […]

(संग्रहित छायाचित्र)

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात अटके त असलेले निलंबित पोलीस अधिकारी रियाज काझी यांना न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काझी यांना ११ एप्रिलला अटक के ली. मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्ह््यात सक्रि य सहभाग आणि पुरावे नष्ट के ल्याचा आरोप एनआयएने काझी यांच्यावर ठेवला आहे. अटके नंतर त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने एनआयए पथकाने काझी यांना शुक्रवारी सुटीकालीन न्यायालयात हजर के ले. त्यांच्याकडील चौकशी पूर्ण झाली असून वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. कारागृहात सुरक्षेबाबत काळजी घेतली जावी, अशी विनंती काझी यांनी वकिलामार्फत न्यायालयाकडे केली. मुख्य आरोपी वाझे यांच्या अटके नंतर एनआयएने काझी यांच्याकडे अनेकदा चौकशी के ली होती. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  ठेवण्यापासून व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येपर्यंत काझी यांचा प्रत्येक ठिकाणी संशयास्पद वावर एनआयएला सीसीटीव्ही चित्रण, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाआधारे आढळला होता.

शुक्र वारी झालेल्या सुनावणीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझे यांनी वकिलाला भेटण्याची परवानगी मागणारा अर्ज सादर केला. तो मंजूर करत न्यायालयाने वाझे यांना २० मिनिटे वकिलाला भेटू द्यावे, असे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suspended police officer riaz qazi in judicial custody abn

ताज्या बातम्या