scorecardresearch

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याची अफवा, अलर्ट जारी

मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट दिसली आहे, त्यानंतर नौदलाकडून समुद्रात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

Suspicious boat
मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट दिसली आहे. (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट दिसली आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून ही बोट शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. तेव्हापासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशायस्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक जॉईंट ऑपरेशन सेंटर नावाची एक संस्था बनवण्यात आली होती. या संस्थेकडून पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यानुसार मुंबईच्या किनारपट्टीजवळ एका लाईट हाऊसच्या जवळच ही बोट दिसली. त्यानंतर सर्व संरक्षण संस्था सक्रिय झाल्या आहेत. सागरी पोलीस आणि नौदलाकडून ही बोट शोधण्याचं काम सुरू आहे.

पालघर पोलिसांनी माहिती दिली आहे की ही बोट गेटवे ऑफ इंडियापासून दक्षिणेकडे ५० नॉटिकल मील दूर पालघरमध्ये दिसली आहे. इंटेलिजेन्स ब्युरो आणि सीबीआयदेखील ही बोटीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ही बोट शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या