मुंबई : संघटित गुन्हेगारी टोळय़ांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांच्या हस्तकांना तडीपार करण्यात येत होते. आता मुंबई पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करण्यात सक्रिय असलेल्या दोन महिला तस्करांवर तडीपारीची कारवाई केली आहे. दोघींविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी सक्रिय टोळी चालवत असल्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

हसीन बानो अली शेख (३३) आणि फिरदोस रशीद शेख ऊर्फ लछो (३०) या दोघीही ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्प येथील रहिवासी आहेत. तहसीनची अमली पदार्थ तस्करीची साखळी आहे आणि फिरदोस ही तिच्या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. दोघीही पूर्व मुंबई भागात प्रामुख्याने ट्रॉम्बे परिसरात अमली पदार्थाच्या विक्रीत सक्रिय आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

bmc 1400 crores cleaning contract case
१४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

दोघींचे पतीही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर आधीच मोक्का आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते सध्या तरुंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तहसीन आणि फिरदोस या परिसरात अमली पदार्थाचा व्यवसाय करीत होत्या. त्यांची टोळी अमली पदार्थ, विशेषत: गांजा विकत होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या परिसरात त्यांची वाढती दहशत पाहून ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेहाना शेख यांनी दोघींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.