लोकलमधील महिला, तसेच अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी करणारे सामान्य प्रवासी, तसेच तृतीयपंथीयांविरोधात तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) डिसेंबर २०२२ मध्ये विशेष कारवाई मोहीम राबविली असून या कारवाईत तब्बल दोन हजार ८३५ जणांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- वांद्रे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

लोकलमध्ये महिला, अपंग प्रवाशांसाठी राखीव डबे आहेत. अपंगांच्या डब्यातून सामान्य प्रवाशांना प्रवास करता येत नाही. तरीही काही प्रवासी अन्य डब्यांतील गर्दी पाहून अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. या डब्यातील अपंग प्रवासी सामान्य प्रवाशांना विरोधही करतात. परिणामी, उभयतांमध्ये वाद होतात. महिलांच्या राखीव डब्यात काही पुरुष प्रवासी नकळत प्रवेश करतात. पुरुष प्रवाशांमध्ये फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. अशा घुसखोरांविरोधात पश्चिम रेल्वेने डिसेंबर २०२२ मध्ये विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या एक हजार ५०३ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांना एकूण तीन लाख २१ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. याशिवाय अपांगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ९८४ सामान्य प्रवाशांचीही धरपकड करण्यात आली. त्यांचावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण एक लाख ९६ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- नाशिक पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला? अजित पवार म्हणाले, “आम्ही…”

दरम्यान, पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने तृतीयपंथीयांविरोधातही कारवाई केली आहे. राखीव डब्यात प्रवेश, तसेच त्रास दिल्याप्रकरणी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन डिसेंबर २०२२ मध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अशा ३४८ तृतीयपंथीयांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख १६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.