‘ऑस्कर’साठी भारताकडून ‘कूळंगल’

‘फिल्म फे डरेशन ऑफ इंडिया’ने ऑस्कर पुरस्कारांसाठी १४ चित्रपटांची यादी केली होती.

तमिळ दिग्दर्शक विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट

मुंबई : ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी  ‘कू ळंगल’ हा तमिळ चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. जवळपास १४ हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळ, गुजराती चित्रपटांमधून दिग्दर्शक शाजी करूण यांच्या नेतृत्वाखालील समितीने ‘कूळंगल’ची निवड के ली आहे. ‘कूळंगल’ हा दिग्दर्शक पीएस विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाने याआधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून नाव कमावले आहे.

‘फिल्म फे डरेशन ऑफ इंडिया’ने ऑस्कर पुरस्कारांसाठी १४ चित्रपटांची यादी केली होती. यात हिंदीतील विद्या बालनची भूमिका असलेला ‘शेरनी’, शूजित सिरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम’ यांच्यासह सिध्दार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘शेरशहा’, फरहान अख्तरचा ‘तूफान’ आणि पंकज त्रिपाठींचा ‘कागझ’ हे चित्रपटही स्पर्धेत होते. मराठीतील ‘आता वेळ आली’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘गोदावरी’ हे तीन चित्रपट स्पर्धेत होते. ‘सरदार उधम’ला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि अमित मसूरकर दिग्दर्शित ‘शेरनी’च्या वेगळेपणामुळे या दोन चित्रपटांपैकी एकाची निवड के ली जाईल, अशी चर्चा होती. मात्र ‘फिल्म फे डरेशन ऑफ इंडिया’चे सचिव सुप्रन सेन आणि शाजी करूण यांनी शनिवारी ‘कूळंगल’  या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून घोषणा के ली.

पिता-पुत्राचे भावबंध

‘कू ळंगल’ची कथा ही दारूच्या नशेत बुडालेला बाप आणि  मुलगा यांच्या नातेसंबंधाभोवती फिरते. नवऱ्याच्या व्यसनाला कं टाळून माहेरी निघून गेलेल्या आपल्या आईला परत आणण्यासाठी मुलाने आणि वडिलांनी के लेला प्रवास अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा असून दिग्दर्शक विनोथराज यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवरून कथा प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. ‘कूळंगल’  हा चित्रपट यावर्षाच्या सुरूवातीलाच नेदरलँड येथे आयोजित के लेल्या रॉटरलँडच्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tamil movie oscars koozhangal represent india akp akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या