मुंबई : बुद्धी, प्रचंड यत्न, कष्ट, अपार जिद्द, सातत्य, कल्पकता या नानाविध गुण-कसोटय़ांवर खरे उतरत तरुण वयात असामान्य कर्तृत्वाने तळपणाऱ्या तेजांकितांचा गौरव सोहळा आज, रविवारी रंगणार आहे. 

करोनासारखे महासंकट, देश-परदेशात उभी राहिलेली आर्थिक-सामाजिक-राजकीय अस्थिरतेची वादळे थोपवत आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाची क्षितिज भरारी घेणे हे सोपे काम नाही. गेल्या दोन वर्षांत लसनिर्मितीवरील संशोधनापासून ते आता सगळय़ांच्या तोंडी असलेल्या कूट चलनापर्यंत आणि मैदानी खेळांपासून मोबाइलच्या छोटय़ाशा खिडकीत सामावलेल्या अफाट मनोरंजनविश्वापर्यंत अनेकविध क्षेत्रात तरुणाईने असामान्य कार्य उभारले. त्यांची घोषणा आज कार्यक्रमात होईल.

shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

भविष्यानेही आशेने पहावे असे कार्य करणाऱ्या वर्तमानातील या प्रज्ञावंतांचा शोध घेत त्यांचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांनी केला जातो. या पुरस्कारांचे हे चौथे पर्व आहे. संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यम, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा-सुव्यवस्था, प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांमधून तज्ज्ञ समितीने निवडलेल्या तरुण तेजांकितांचा हा गौरवक्षण आहे.

हिंदी – मराठी चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाने रसिकांना जिंकून घेणारी अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे.

धर्मेद्र प्रधान

यांच्या हस्ते सन्मान..

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार कार्यक्रमात केंद्रीय मंत्री (शिक्षण आणि कौशल्य विकास) धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते या तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात येणार आहे.

स्वरमैफल.. या पुरस्कार संध्येला जुनी, अवीट गोडीची

गाणी ‘द म्युझिशियन्स’ हा बॅण्ड नव्याने सादर करणार आहे. सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब आणि आर्चिस लेले यांच्या वाद्यवादनात आणि अभिनेता पुष्कर श्रोत्रींच्या निवेदनात बांधलेली ही सुरांची मैफल सादर होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे.

प्रायोजक..

’मुख्य प्रायोजक :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

’सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.,  वर्ल्ड वेब सोल्युशन्स, सिडको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, झी मराठी

’पॉवर्ड बाय : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

’नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटरहाउस कूपर्स

’टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा