टॅक्सीचालकाच्या इशाऱ्यानंतर ‘अँटेलिया’च्या सुरक्षेत वाढ

टॅक्सीचालकाने दिलेल्या संशयित वाहनाचा क्रमांक चुकीचा निष्पन्न झाला आहे.

मुंबई : संशयित व्यक्ती अँटेलिया इमारतीबद्दल चौकशी करत असल्याची माहिती एका टॅक्सीचालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत टॅक्सीचालकाला आझाद मैदान पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी अधिक माहिती घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून अँटेलिया इमारतीच्या परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दोन पर्यटकांनी आपल्याला उद्योजक मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारला. या दोघांकडे एक भली मोठी बॅग होती असेही या टॅक्सीचालकाने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ते कारमधून पुढे निघून गेले. संशयास्पदरीत्या या दोन व्यक्ती फिरत असल्याची माहिती या टॅक्सीचालकाने दिली.  त्यानंतर आझाद मैदान पोलीसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. चालकाने दिलेली माहिती पडताळून पाहत आहोत, असे पोलिसांनी  सांगितले. मात्र हा दूरध्वनी आल्यानंतर अँटेलिया परिसरातील रस्त्यावर पोलिसांनी वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, टॅक्सीचालकाने दिलेल्या संशयित वाहनाचा क्रमांक चुकीचा निष्पन्न झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taxi driver informed police about suspect investigating antelia building zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या