Taxi rickshaw fare hike from today CNG rates increasing ysh 95 | Loksatta

टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ आजपासून लागू

टॅक्सीच्या किमान भाडय़ात तीन रुपयांनी, तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढविण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली होती. ही भाडेवाढ उद्या, शनिवारपासून लागू होणार आहे.

टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ आजपासून लागू
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई : टॅक्सीच्या किमान भाडय़ात तीन रुपयांनी, तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढविण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली होती. ही भाडेवाढ उद्या, शनिवारपासून लागू होणार आहे. एनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. शनिवारपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार रिक्षाच्या भाडय़ात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये तर, टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे शनिवारपासून २१ रुपयांवरून २३ रुपये, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे.

रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर प्रवास करण्यासाठी २७ रुपयांऐवजी २९ रुपये आणि टॅक्सीसाठी ३२ रुपयांऐवजी ३५ रुपये द्यावे लागणार आहेत. रिक्षामधून दिवसा पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी ७१ रुपयांऐवजी ७७ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटर प्रवासासाठी ८९ रुपयांऐवजी थेट ९६ रुपये द्यावे  लागणार आहेत. तर, दिवसा दहा किलोमीटर प्रवासासाठी १४२ रुपयांऐवजी १५३ रुपये भाडे द्यावे लागेल.

बेस्टचा प्रवास स्वस्त..

काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे. पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी  ८५ ऐवजी ९३ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटरसाठी १०६ ऐवजी ११७ रुपये द्यावे लागणार आहेत. सध्या बेस्टच्या साध्या बसमधून पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी पाच रुपये आणि वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी सहा रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीपेक्षा बेस्टचा प्रवास स्वस्त आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी लवकरच सवलती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
“हा बंगला बघून ED ला काहीच वाटत नाही का?” अंजली दमानियांचा सवाल, राणेंच्या अनधिकृत बांधकामाचा केला उल्लेख!
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे?
प्रवाशांसाठी खुशखबर! विमान प्रवासदरम्यान वापरता येणार मोबाईल, Airplane Mode होणार भुतकाळात जमा; कारण…
थंडीत मोजे घालून झोपल्यास शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम; थंडी घालवायची तर ‘हे’ झटपट उपाय पाहा
“नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला
पुणे : हैद्राबाद परिवहन महामंडळाच्या बसमधून राज्यात गांजा आणण्याचा प्रकार उघड ; सीमाशुल्क विभागाची सोलापुरात कारवाई; ५६ किलो गांजा जप्त