शिक्षकास अटक

गोवंडी परिसराच्या रफिक नगर मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

गोवंडी परिसराच्या रफिक नगर मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद उस्मान शाह (४०) याच्याकडून अरबी भाषा शिकण्यासाठी परिसरातील ७ ते १२ वयोगटांतील मुले-मुली येत असत. शाह हा तेथे येणाऱ्या मुलींबरोबर अश्लील चाळे करीत होता.  याबाबत एका मुलीने पालकांकडे तक्रार केली. पालकांनी  गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर शाह याला पोलिसांनी अटक  केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Teacher arrested in govandi