१५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान आयोजन

मुंबई : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) आयोजन १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. दोन वर्षांनी ही परीक्षा होते आहे.

याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने सुमारे १० लाख शिक्षक परीक्षा देतील असा अंदाज आहे. राज्यभरात २० ते २५ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीकरिता टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.