देशाच्या उत्तरेच्या टोकावर सुरू असलेल्या हिमवर्षावात वाढ झाली असून उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. तसेच, हिमवर्षावामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे आणखी वेगाने वाहू लागले आहेत. परिणामी, शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यभरातील बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबईतील किमान तापमान पुन्हा एकदा घसरले असून, मंगळवारी ते १४.८ अंश तापमान नोंदवले गेले. हेही वाचा- घराची ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्या, बाळकुम प्रकल्पातील विजेत्यांची म्हाडा कोकण मंडळाकडे मागणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून १५ जानेवारी रोजी मुंबईत यंदाच्या थंडीच्या हंगामातील सर्वात नीचांकीचे किमान तापमान १३.८ अंश नोंदवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या पंधरवड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली. मात्र रात्री, पहाटे वातावरणात थंडावा आणि दुपारी उबदारपणा कायम राहिला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली असून पारा १४ अंशावर आला आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज असून यंदाच्या हंगामातील नव्या नीचांकीच्या तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हेही वाचा- भाजपला बाळासाहेबांशिवाय राज्यात मते मिळणे अशक्य! उद्धव ठाकरे यांची टीका सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान मंगळवारी अनुक्रमे १४.८ अंश आणि १७.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर, सांताक्रूझ येथील कमाल तापमान २६.५ अंश आणि कुलाबा येथील कमाल तापमान २५.५ अंश नोंदवण्यात आले. दोन्ही केंद्रातील कमाल तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ४ अंशाने कमी आणि किमान तापमान १ ते २ अंशाने कमी असल्याची नोंद करण्यात आली. हेही वाचा- ठाकरे गट-वंचित युती; राज्यात नवे राजकीय समीकरण, काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचा दावा उत्तर भारताच्या टोकावर मोठ्या प्रमामावर हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडावा वाढला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. मात्र, पश्चिमी झंझावात येत असल्याने तापमानात किंचितशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केली.