मुंबई : कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी हापा – मडगाव एक्स्प्रेससह हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>> राष्ट्रगीत अवमान प्रकरण : ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाचा तडाखा; दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले
गाडी क्रमांक २२९०९८ हापा-मडगाव एक्स्प्रेस २९ मार्च रोजी आणि गाडी क्रमांक २२८०७ मडगाव-हापा एक्स्प्रेसला ३१ मार्च रोजी शयनयान श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडून ही गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक २२४७५ हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक एक्स्प्रेस 5 ते २६ एप्रिलपर्यंत आणि गाडी क्रमांक २२४७६ क्रमांकाची कोईम्बतूर – हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस ८ ते २९ एप्रिलपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा वातानुकूलित डबा जोडला जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.