मुंबई: मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) नरीमन पाँईट येथील ४.२ एकराचा भूखंड ९० वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी स्वारस्य निविदा मागविण्यात आली होती. पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली असून काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचे एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एमएमआरसीकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा ३३.५ किमीचा भुयारी मेट्रो मार्ग बांधला जात आहे. यातील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. उर्वरित टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान या मार्गिकेसाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी एमएमआरसीने अनेकविध पर्याय पुढे आणले आहेत. त्यानुसार या मार्गिकेदरम्यान एमएमआरसीकडे हस्तांतरीत झालेल्या भूखंडांचा व्यावसायिक वापर करत भूखंड भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून त्यातून महसूल मिळविण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. मेट्रो ३ मार्गिकेतील अनेक ठिकाणच्या भूखंडांचा असा वापर केला जाणार आहे. या निर्णयानुसार नरीमन पाँईट येथील ४.२ एकरचा भूखंड ९० वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी एमएमआरसीने स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. यातून एमएमआरसीला ५१७३ कोटी रुपये इतका महसूल मिळणे अपेक्षित आहे. मात्र आता ही स्वारस्य निविदा रद्द करण्यात आली आहे.

mahavitaran 100 days target news
मागेल त्याला सौर कृषी पंप; ‘महावितरण’चे १०० दिवसांचे उद्दिष्ट ६० दिवसांत पूर्ण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
MHADA housing lottery draw by Minister Eknath Shinde hands
‘म्हाडा’ कोकण मंडळ सोडत : २२६४ पैकी केवळ १२३९ घरांचीच विक्री
CIDCO assurance Dronagiri Node project victims plots uran navi mumbai
सिडकोकडून द्रोणागिरी नोड प्रकल्पग्रस्तांना पुन्हा भूखंडाचे आश्वासन, ३५ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रतीक्षा कायम
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन

हेही वाचा >>>Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलीस का करत आहेत? यामागची दहा महत्त्वाची कारणं काय?

एमएमआरसीकडून नुकतीच ही स्वारस्य निविदा रद्द करण्यात आल्याचे वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे जाहीर करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आल आहे. नेमके यामागे प्रशासकीय कारण काय आणि ही निविदा कायमस्वरुपी रद्द करण्यात आली आहे का याबाबत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना विचारले असता त्यांनी निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कुठेही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही किंवा निविदा कायमस्वरुपी रद्द करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले आहे. सध्या चालू असलेली निविदा प्रक्रिया फक्त रद्द करण्यात आल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले. त्यामुळे ९० वर्षांसाठी हा भूखंड भाड्याने देण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागविल्या जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader