मुंबई : दागिने विक्रीसह गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात व्याजासह परतावा मिळणे अपेक्षित असताना तो न मिळाल्याने कंपनीच्या दादरसह मुंबई-नवी मुंबईतील कार्यालये व दुकानांबाहेर सोमवारी मोठी गर्दी जमल्यामुळे गोंधळाची स्थिती होती. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत सुमारे ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोने, चांदी, हिरे यांची विक्री करणाऱ्या ‘टोरेस’ कंपनीने गतवर्षी ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत कार्यालय सुरू केले. दागिन्याची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला ४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले. शहरात कंपनीच्या ६ शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. ४ हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवड्याला परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतविले. सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला. नंतर कंपनीने व्याजदर वाढवून ६ टक्के केल्यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली. त्यानंतर कंपनीने थेट ११ टक्के परताव्याचे आमिष दाखविल्यामुळे दादरमधील शाखेत गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवारदरम्यान परतावा मिळत असे. मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना परतावा व मुद्दल मिळाली नाही. त्यामुळे गोंधळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी विचारणा केल्यानंतर ८ जानेवारीपर्यंत परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत कंपनीत गुंतवणूक सुरूच होती. रविवारी, ५ जानेवारी रोजीही शेकडो नागरिकांनी आपला पैसा गुंतविला. मात्र, रात्री उशिरा दादरमधील शाखेत आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू झाली व मध्यरात्रीपासूनच गुंतवणूकदार कार्यालयाच्या परिसरात जमायला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी तेथे प्रचंड गर्दी झाली. ‘टोरेस’च्या शहरातील अन्य कार्यालयांवर असेच चित्र होते. रविवारी सकाळपासूनच दादरमधील शाखेबाहेर उभा आहे, मात्र कुठूनही पैसे परत मिळतील याची आशा दिसली नसल्याचे कंपनीतील एक गुंतवणूदार मेहूल चौधरी यांनी सांगितले.

bombay hc ordered to form special investigation team to investigate financial fraud
७,३०० कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण; एसआयटी चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
pune police loksatta news
पिंपरी : रूग्णालयात गुंतवणुकीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याची सव्वाकोटीची फसवणूक
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा
fake investment apps news in marathi
हे गुंतवणुकीचे नव्हे, फसवणुकीचे मार्ग

हेही वाचा >>>अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले

दरम्यान, पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथक दादरमधील कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले. अखेर रात्री ८च्या सुमारास गर्दी पांगविण्यात पोलिसांना यश आले. ६पैकी ३ शाखांची गुंतवणूकदारांनी मोडतोडही केली. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फसवणुकीच्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी

बनावट दागिन्यांची विक्री

●कंपनीकडून विक्री होणारे दागिने बनावट होते. त्याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती. मात्र, अधिक परतावा मिळत असल्याने अनेकांनी केवळ लालसेपोटी गुंतवणूक सुरू ठेवल्याचे समजते.

●कंपनीने आतापर्यंत अनेकांना नफा मिळवून दिला. उच्चभ्रू परिसरातील इमारतीत घरे, गाड्या, दागिने असा आकर्षक परतावा देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.

● त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढली. सहा लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर ११ टक्के आणि त्यापेक्षा कमी रक्कमेवर चार टक्के परतावा दिला जात असे. त्यामुळे अनेकांनी कंपनीत करोडो रुपये गुंतविले. कंपनीने अन्य ७ देशांमध्येही फसवणूक केल्याची माहिती आहे.

मित्रमंडळीत सातत्याने चर्चेचा विषय असलेल्या या कंपनीबाबत अधिक माहिती जाणून घेतली. तसेच, त्यांना होणारा नफा बघून लालसेपोटी योग्य – अयोग्य समजेनासे झाले. त्यामुळे अधिक परतावा मिळण्याच्या आशेने घर विकून १७ लाख रुपये कंपनीत गुंतविले. बुधवारपर्यंत पैसे मिळतील, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस प्रतीक्षा करणार आहे.– ज्ञानेश्वर बोडके, गुंतवणूकदार

शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या परतव्यातून टोरेस कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला चांगला नफा मिळाल्यानंतर मित्रांनाही यात गुंतवणूक करण्यास सांगितले. माझ्यामुळे त्यांची फसवणूक झाल्यामुळे अपराधीपणाची जाणीव होत आहे. यामुळे जिवलग मित्र गमावण्याची वेळ आली आहे. – मेहुल चौधरी, गुंतवणूकदार

Story img Loader