मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप घेतला आहे. हे वेळापत्रक म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाने यापूर्वीच केली असून अध्यक्षांच्या या वेळकाढूविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा मुद्दा सोडून इतर विषयात वेळ घालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी केला आहे. ठाकरे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा मुद्दा ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत मांडला जाणार आहे. वेळापत्रक जाहीर करून विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे.