नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१, तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली आहेत. दरम्यान, भाजपाच्या या पराभवानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नागपूरमधील भाजपाचा पराभव हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव असल्याचे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

Yavatmal Washim lok sabha election 2024 constituency overview Shinde group benefit or loss of changing candidates at last minute
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?
narayan rane vs vinayak raut
समाजवादाकडून हिंदुत्वाकडे झुकलेल्या तळकोकणात रंगतदार सामन्याची प्रतीक्षा… राणे वर्चस्व राखणार की राऊत हॅटट्रिक करणार?
akola lok sabha 2024 marathi news, akola congress lok sabha candidate marathi news,
अकोल्यात काँग्रेसचे ठरेना; उमेदवाराची प्रतीक्षा
Sureshdada Patil
शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुरेशदादा पाटील यांचे मातोश्रीवर प्रयत्न; भाजपचा घटक पक्ष दुरावणार?

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?

“नागपूर विधानपरिषेदची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्या सारख्याचे नेत्यांचे राजकीय प्रस्थ असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपाचा आणि मिंधे गटाचा पराभव करून महाविकास आघाडीचे उमेदवार अडबाले निवडून आले आहेत. त्यामुळे हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बानवकुळे यांचा आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

हेही वाचा – MLC Elections Result: “सत्यजीत तांबे भाजपात जाणार नाहीत, कारण…”, दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “पाठिंबा.,,”!

पुढे बोलताना, “नागपूरमधील सर्व मतदारांनी दाखवून दिलेलं आहे, की सध्याच्या मिंधे सरकारपेक्षा महाविकास आघाडीवर त्यांचे प्रेम आहे. ते प्रेम या निवडणुकीतून दिसून आलं आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मै हू डॉन गाण्यावर भन्नाट डान्स, लोकांना आली ‘त्या’ आव्हानाची आठवण

दरम्यान, बारा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली आहे. भाजपाने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.