मुंबईसह उपनगरात पावसाने जोर धरला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत चार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दुर्गा चाळ येथील घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

दुर्गा चाळ, घोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली एकूण ७ जण अडकले होते. तर पाच जणांना बाहेक काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती कळवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरांवर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चार घरांवर दरड कोसळल्याने ती घरं नेस्ताबूत झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखालून अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं आहे. पण आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर प्रीती यादव (५ वर्ष) अचल यादव (१८ वर्ष) यांना यशस्वीरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे आणि त्यांना ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर या दुर्घटनेट ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामंध्ये प्रभू सुदाम यादव (४५ वर्षे) विधवतीदेवी प्रभु यादव (४०वर्षे) रविकिसन यादव (१२ वर्ष) सिमरन यादव (१० वर्षे) संध्या यादव (३ वर्ष) यांचा समावेश आहे.