ठाणे-पनवेल एसी प्रवास १८५ रुपयांत

अल्पावधीतच मोठी प्रवासीसंख्या गाठणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावर आजपासून वातानुकूलित लोकलसेवा सुरू होत आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अल्पावधीतच मोठी प्रवासीसंख्या गाठणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावर आजपासून वातानुकूलित लोकलसेवा सुरू होत आहे. उद्घाटनाच्या दिवशी पनवेल ते ठाणे अशी वातानुकूलित लोकल धावेल. ३१ जानेवारीपासून या लोकलच्या नियमितपणे १६ फेऱ्या होतील. ठाणे ते पनवेलपर्यंतचे भाडे १८५ रुपये आकारले जाणार आहे, तर पनवेलपर्यंतचा वातानुकूलितचा पास १ हजार ९८५ रुपये आहे.

एसी’ लोकलचे वेळापत्रक

 पनवेल ते ठाणे- स. ५.४४ वा

 • ठाणे ते नेरुळ- स. ६.४६ वा
 • नेरुळ ते ठाणे- स. ७.२९ वा
 •  ठाणे ते वाशी-स. ८.०८ वा
 • वाशी ते ठाणे- स. ८.४५ वा
 • ठाणे ते वाशी- स. ९.१९ वा
 •  नेरुळ ते ठाणे- स. ९.५७ वा
 • ठाणे ते बेलापूर- स. १०.४० वा
 •  पनवेल ते ठाणे- सायं. १६.१४ वा
 • ठाणे ते नेरुळ- सायं. १७.१६ वा
 •  नेरुळ ते ठाणे- सायं.१७.५४ वा
 • ठाणे ते नेरुळ- सायं. १८.२९ वा
 •  नेरुळ ते ठाणे- रात्री. १९.०८ वा
 •  ठाणे ते पनवेल- रात्री १९.४९ वा
 •  पनवेल ते ठाणे- रा. २०.५२ वा
 • ठाणे ते पनवेल- रा. २१. ५४ वा

तिकीट दर (आरंभ स्थानक ठाणे)

स्थानक             तिकीट         पास

घणसोली        ९५ रु.                १,०५५ रु

नेरुळ              १४० रु                १,५१० रु

बेलापूर           १४० रु                  १,५१० रु

खारघर           १८५ रु                 १,९४० रु

पनवेल           १८५ रु                  १,९८५ रु

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane panvel ac railway akp

ताज्या बातम्या