रे रोड येथील १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. जुन्या पुलाच्या जागी केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली असून साधारण दीड वर्षात नवीन उड्डाणपूल सेवेत दाखल होईल, अशी माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्यांनी दिली.

हार्बर मार्गावरून जाणाऱ्या या पुलामुळे भायखळा आणि माझगाव परिसर जोडला जातो. ब्रिटिश राजवटीत मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांचे नाव रेल्वे स्थानक आणि उड्डाणपुलाला देण्यात आले आहे. १९१० मध्ये बांधलेल्या जुन्या पुलावर केवळ दोन वाहतूक मार्गिका आहेत. पूल पूर्वमुक्त मार्गावरील माहुर रोड आणि बॅरिस्टर नाथ पै मार्ग यांना जोडतो, तो पी. डिमेलो रस्त्याला समांतर आहे. रे रोड स्थानकाची इमारत ही ऐतिहासिक वास्तू आहे.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

नवीन केबल स्टेड पूल उभारल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार आहे. प्रस्तावित पुलासाठी अतिरिक्त जमिनीची गरज भासणार नाही. तर कमीत कमी खांबाच्या आधारावर पुललाची उभारणी करण्यात येईल. माहुल रोड आणि बॅरिस्टर नाथ पै मार्गाचे रॅम्प नवीन पुलाशी जुळवून ठेवता येतील.

नवीन पुलाच्या रेखाचित्राला मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेकडूनही मंजुरी मिळाली आहे. सध्या पुलाला लागूनच असलेली केबल, पाइप आणि अन्य वस्तू हटविण्याचे आणि अन्यत्र स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्याचे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.

केबल स्टेड पुलाचे वैशिष्ट्य –

  • हा पूल सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेडसारखा असेल.
  • सध्या पुलावर वाहनांसाठी दोन मार्गिका आहेत. नवीन पुलावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका अशा एकूण सहा मार्गिका असतील.
  • २८० मीटर लांबीच्या संरचनेत कॉटन ग्रीन बाजूला एक पदपथ असेल.
    -.नवीन पूल उभारणीसाठी १४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • एलईडी विद्युत रोषणाई असलेल्या या नवीन पुलामुळे ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्यात भर पडेल.
  • लोकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पुलावर सेल्फी पॉइंटही असेल.